शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

भाजप-राष्ट्रवादीला बंडखोरीचे ग्रहण : आजरा नगरपंचायत निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:44 IST

आजरा : आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तिरंगी, तर नगरसेवकपदासाठी बहुरंगी लढती होत आहेत. भाजपसह राष्ट्रवादीलादेखील या निवडणुकीत बंडखोरीचे ग्रहण

कृष्णा सावंत।आजरा : आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तिरंगी, तर नगरसेवकपदासाठी बहुरंगी लढती होत आहेत. भाजपसह राष्ट्रवादीलादेखील या निवडणुकीत बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. सर्वच प्रभागांत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढल्याने त्याचा कुणाला फायदा, कुणाला फटका बसणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

भाजपचे नेते अशोक चराटी यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडी, राष्ट्रवादी-काँगे्रस व शिवसेनेचे संभाजी पाटील गट यांची आघाडी आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन टोपले, दयानंद भुसारी व शिवसेनेचे शहरप्रमुख विजय थोरवत यांची परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे.चराटी यांनी भाजपऐवजी ताराराणी आघाडी रिंगणात उतरविली आहे. मात्र, भाजपचे जुने कार्यकर्ते व माजी सरपंच जनार्दन टोपले यांच्या पत्नी स्मिता टोपले आणि दयानंद भुसारी यांच्या पत्नी माजी सरपंच नयन भुसारी, तर चराटी यांचे निकटवर्ती दिनेश कुरूणकर यांनी बंडखोरी केली आहे.

ताराराणी आघाडीतर्फे चराटी यांच्या कन्या ज्योत्स्ना पाटील-चराटी या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्यासमोर परिवर्तन आघाडीच्या स्मिता टोपले आणि राष्ट्रवादी-काँगे्रस आघाडीच्या अलका शिंपी यांचे आव्हान आहे. प्रभाग ११ मधून नगरसेवकपदासाठी स्वत: चराटी रिंगणात उतरले आहेत. त्यांचे निकटवर्तीय दिनेश कुरूणकर यांनी त्यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे.राष्ट्रवादी व काँगे्रसची आघाडी एकसंघ वाटत असतानाच राष्ट्रवादी आघाडीचे प्रमुख व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई यांचे चिरंजीव विक्रमसिंह देसाई आणि त्यांचे निकटवर्तीय वाय. बी. चव्हाण यांच्या पत्नी सुमन यशवंत चव्हाण यांनी बंडखोरी केली आहे.

राष्ट्रवादी-काँगे्रस  आघाडीने प्रभाग दोनमधून शिवसेनेच्या संभाजी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंददादा देसाई यांचे चिरंजीव विक्रमसिंह देसाई यांनीच बंडखोरी केल्याने या आघाडीसमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे.प्रभाग ११ मध्ये अण्णा-भाऊ समूहाचे प्रमुख व माजी सरपंच अशोक चराटी, माजी सरपंच जनार्दन टोपले, जनता एज्युकेशन सोसायटीचे संचालक दिनेश कुरूणकर, जि. प. सदस्य जयवंतराव शिंपी यांचे समर्थक अमित महाडिक यांच्यात चौरंगी सामना होत आहे. येथील लढतीकडे आजऱ्यासह जिल्ह्याचे लक्ष आहे.नगरसेवकपदासाठी बहुरंगी लढतीआजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तिरंगी, तर नगरसेवकपदासाठी बहुरंगी लढतीभाजपसह राष्ट्रवादीलादेखील या निवडणुकीत बंडखोरीचे ग्रहण लागलेसर्वच प्रभागांत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढल्याने त्याचा कुणाला फायदा.. कुणाला फटका..भाजपचे नेते अशोक चराटी यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडी४राष्ट्रवादी-काँगे्रस व शिवसेनेचे संभाजी पाटील गट यांची आघाडी, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन टोपले, दयानंद भुसारी व शिवसेनेचे शहरप्रमुख विजय थोरवत यांची परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर